मला येत नाही

तुला येतसे ते मला येत नाही
मला येतसे ते तुला येत नाही


उगी ना नटावे कधी कोंदणाने
तिचा दूरवर यार संकेत नाही


जया  वाटते आपली आपलीशी
पडे तोंड कळताच हाकेत नाही


अशी प्रेयसी आणली शोधुनी मी
खर्‍या आशयाला दगा देत नाही


तिचे वागणे हे तिचे रूप आहे
अलंकार अंती कुठे नेत नाही


 

गझल: 

प्रतिसाद

इथे चालली कार्यशाळा असावी
कुणी आशयावर मते देत नाही

निघालोच आहे, समाधान ह्रुदयी
तुम्हासारखे कुणी समवेत नाही

 

रचना वृत्तात आहे ही जमेची बाजू आहे. पुढील गझलेसाठी शुभेच्छा.


इथे ती म्हणजे कविता आहे. दागिने म्हणजे मात्रा आहेत.

जे श्री अजय जोशी म्हणत आहेत ते इथे शक्यच कसे होऊ शकते असा मला प्रश्न पडला आहे. दुसर्‍याच्या नावाने प्रतिसाद देऊ शकणे जर काही बिघाडामुळे शक्य होत असेल तर ते घातक आहे.

अजय जोशी ह्यांना नक्की कुठली अडचण आली हे त्यांनी सांगितल्यास त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करता येईल.

आधी ब-याच जणांनी सूचना केल्याप्रमाणे भूषण हे वॄत्तात लिहीत आहेत. हे ही कवीच्या मनोभूमिकेचे उत्तम उदाहरण आहे. त्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन. त्यामुळे भूषण यांनी लिहीत जावे. मला वाटते ते पुढील प्रमाणे :-
१. गझलेवर चर्चा ही फार लांबवू नये.
२. मनाला कोणी लावून घेवू नये.
३. प्रतिसाद गझलेवर असावा. वैयक्तिक नको.
४. वैयक्तिक प्रतिसाद निरोपातून पाठवावा. उघड नको.
५. गझलकाराने आपले अंतरंग - प्रतिभा - अधिकार त्याच्या गझलेतून दाखवून द्यावा.
६. गझलकारांनी आपापसात भांडू नये. मराठी गझलेला अधिक उंचावर नेण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.
७. मराठीतील नवीन शब्दरचनांचाही स्विकार करुया.
८. इत्यादी, इत्यादी ...
मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे.
तिचा मान ठेवून गझल साधावी, जरी मूळ ती गझलभाषा नसे.

अजय अनन्त जोशी महाशय,
आपण या संकेत स्थळाचे प्रशासक म्हणून काम करता का ?
*गझल चर्चा फार लांबते असं वाटत असेल तर त्यात भाग घेऊ नका. तुम्हाला कुणीही चर्चा करण्याची सक्ती केलेली नाही. हे संकेत स्थळ गझल साठी असल्याने गझलेबाबत ची सर्व चर्चा सभासद इथे कितीही काळ सुरू ठेऊ शकतात.
* गझल बाबतचे प्रतिसाद म्हणजे जर गझलेबाबतचीच चर्चा असेल तर निरोपतून पाठवणे अयोग्य आहे
*कुणी गझले बाबतची चर्चा वैयक्तिक पातळवर घ्यायची ठरवलीच असेल तर मग त्याला इलाज नाही. 
*वैयक्तिक पातळीच्या शेरे बाजीच्या तुमची व्याख्या काय आहे ते मला माहिती नाही. पण जर काही वैयक्तिक पातळीवर शेरे बाजी वाटली तर निदर्शनास आणून द्या. अशी शेरेबाजी इथे कधीच ठेवली जात नाही.
***गझलकाराने आपले अंतरंग - प्रतिभा - अधिकार त्याच्या गझलेतून दाखवून द्यावा.** या तुमच्या विधानाची गरज काय ते कळेल काय ?
विश्वस्त : या प्रतिसादाचा आक्षेपार्ह भाग संपादित केलेला आहे

सन्माननीय श्री ६४,
व्यास माझ्यात या गझलेवरचा माझा प्रतिसाद बघावात.
मुद्यावर येत बोलतो.
एखाद्या वेबसाइटवर कुणालाही दुसर्‍याच्या नावाने काहीही लिहिण्याची प्रोव्हिजनच नसते. हा जर तांत्रिक बिघाड असेल तर तो बघितला गेला पाहिजे.
विश्वस्त : या प्रतिसादातील आक्षेपार्ह भाग संपादित केला आहे

हे कुणालाही वैयक्तिक उद्देशून नाही. सर्वसाधारणपणे मला काय वाटले ते लिहिले आहे. मी येथला अधिकारी नाही. त्यामुळे हे नियम नाहीत. वातावरण निकोप रहावे यासाठी मला काय वाटले ते मी लिहिले. जयहिंद!
विश्वस्त : या प्रतिसादाचा आक्षेपार्ह  तसेच वाचता न येणारा भाग संपादित केलेला आहे. सभासदांनी इतर कुठलेही फाँट वापरून  प्रतिसाद देऊ नयेत याची नोंद घ्यावी.