कैकदा मेलोत आम्ही
कैकदा मेलोत आम्ही काय तुम्ही सांगता
की म्हणे मृत्यूच आहे जीवनाची सांगता
भिंत थोडी हालली अन आरसा काळोखला
जाग आली कीटकांना मी कहाणी सांगता
केवढाही धीर असला अन किती सामर्थ्यही
तू मला ऐकून होशिल पाणीपाणी सांगता
ती इथे आलीच नसता गंध दरवळला कसा
की तुम्ही खोटेच मजला रातराणी सांगता
गझल तुरळक आणि चर्चा लांबताना पाहिली
भांडता वरती उदाहरणे भटांची सांगता
गझल: