मिळो

रहाया सुखाचे निवारे मिळो
जगाला सुगंधी फवारे मिळो


कुणी शाप द्यावे कुणाला किती
हरेकास येथे किनारे मिळो


सदा उंच न्यावा यशाचा झुला
नव्या वैभवाला मिनारे मिळो


जरी पाहिले ना कुणीही  किती
जुन्याला नवे हे भिणारे मिळो


बहरताच स्वप्ने कळ्यांची नवी
फुलाया फुलांना शहारे मिळो


बिजांना सुचावे नव्याने उगी
रुजाया पिकांना शिवारे मिळो


उघडताच डोळे दिपावे असे
पहाया शराबी चिनारे मिळो    - बापू दासरी

गझल: 

प्रतिसाद

वा बापू वा, तुमची अजून एक कविता  आवडली .... मी पण कधीकाळी अशाच  छान-छान कविता लिहित असे पण आता वाढत्या वयानुसार तितकेसे जमत नाही...
उतारे, इषारे,पसारे, पहारे,पिसारे, नजारे,नगारे,धुमारे,शिकारे,गटारे,भुयारे. ढिगारे,निखारे,निवारे,खटारे,बिचारे,विचारे,उगारे,हजारे अशी अनेक यमके बाकी आहेत. अजून लिहा, मी वाट बघतोय. कविता नेहमी मोठीच हवी. कवीने कुठलेही यमक सोडायचे नाही कारण प्रत्येक यमक हे कवीसाठी एक आव्हानच असते. त्याही आपण वृत्तात लिहू शकतो म्हटल्यावर एकही यमक उरता कामा नये  अशी जुनी  प्रथा  आहे असे म्हणतात. आपल्या रचनांमुळे मराठी कवितांचे भविष्य अधिक उज्ज्वल होवो. आपणास मनापासून शुभेच्छा देतो.
माझी एक रचना आर्धवट आठवली ....
कुणाचे आज मी नुसते इषारे शोधतो आहे
कशाला आज मी तुमचे  निखारे शोधतो आहे
मलाही माहिती नाही मिळाली राजदरबारी
स्वतःतच आज मी  अण्णा हजारे शोधतो आहे
कितीही वाजवा नाचा, तमाशा रोजचा आहे
कुणीतो एकटा फुटके नगारे शोधतो आहे
शिवारे शोधतो आहे, गटारे शोधतो आहे
बिचारा एक नेताही बिचारे शोधतो आहे
नव्याने आज इतिहासा नजारे शोधतो आहे
जुने  मी  शिकडो किल्ले, भुयारे शोधतो आहे
कुणाचे हाल झालेले पसारे शोधतो आहे
अजूनी लाल मिर्चीचे धुमारे शोधतो आहे
                                                   - ६४-बिट्स
 

 
 

म्हणजे वरील गझले बद्द्ल आपल्या शंका आहेत काय ?  बापू

मुळीच शंका नाही या रचने बद्दल. सर्व काही स्पष्ट दिसतेच आहे की ?