तुझ्यास्तव.....

अता पावसाला मलाही रडू दे
तुझ्या हातच्या मेंदिलाही कळू दे

अता सोडली आठवे या किनारी
उद्याला तुला त्या किनारी मिळू दे

तुला दु:ख झालेलं पाहू कसे मी
तुझ्यापासुनी दु:ख माझे दडू दे

तुला स्पर्श लाभावया चांदण्याचा
इथे सूर्य वक्षात माझ्या जळू दे

ऋतूंच्यासवे मी मला शोधताना
वसंतात या तू मला सापडू दे

लिलावात काढून हे व्यर्थ जीणे
जरा लोभ मृत्यूवरीही जडू दे

[टीज़रच्या टेक्स्टएरियात गझल टाकू नये. दिसणार नाही.--विश्वस्त]

गझल: 

प्रतिसाद

धन्यवाद,
तुमच्या सूचना मदत करतील......