गुंजते कानात हाळी...

गुंजते कानात हाळी... नेहमीची
आठवांची ही भूपाळी... नेहमीची


दिवसभर हा चेहरा हसराच असतो
आसवांची रात्रपाळी...नेहमीची


सुख मला सोडून जाते, दु:ख नाही
वाट ही माझी निराळी... नेहमीची


भोवताली, ठाण मांडुन बैसलेली
यातनांची मांदियाळी...नेहमीची


पिंपळाचे पान... हे आयुष्य माझे
तू उगा जपतेस जाळी...नेहमीची


उधळुनी अंधार जनतेच्या नशीबी
राज्यकर्त्यांची दिवाळी...नेहमीची


वेदनेवरची झटकतो राख माझ्या
म्हणुन गझलेला झळाळी... नेहमीची


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

पिंपळाचे पान... हे आयुष्य माझे
तू उगा जपतेस जाळी...नेहमीची

मस्त हा शेर आवडला.

गझल छान आहे. पहिले दोन शेर विशेष आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

बरेचसे शेर हे अतिशय वैयक्तिक पातळीचे दिसून येतात,
काहीसे आत्म्स्तुतीकडे ढळलेले (याचा बळी मीपण पडलोय!)
जमीन चांगली आहे, अजून चांगले लिहीता येईल असे वाटते...
शुभेच्छा

दिवसभर हा चेहरा हसराच असतो
आसवांची रात्रपाळी...नेहमीची
वा...वा...आसवाचंी रात्रपाळी...छान आहे कल्पना.
सुख मला सोडून जाते, दु:ख नाही
वाट ही माझी निराळी... नेहमीची
छान
आवडले हे दोन्ही शेर...शुभेच्छा, जनार्दन.
............................................
मलाही आठवली आठ-दहा वर्षांपूर्वीची माझी गझल... जवळपास अशाच अन्त्ययमकाची.
जवळ येणे, दूर जाणे... नेहमीचे !
हे तुझे सारे बहाणे... नेहमीचे !
वागणे नाही बरे वेड्याप्रमाणे...
सांगती सारे शहाणे... नेहमीचे !

दिवसभर हा चेहरा हसराच असतो
आसवांची रात्रपाळी...नेहमीचीपिंपळाचे पान... हे आयुष्य माझे
तू उगा जपतेस जाळी...नेहमीची                                 वेदनेवरची झटकतो राख माझ्या
                                म्हणुन गझलेला झळाळी... नेहमीची   हे शेर अतिशय आवडलेत
                                                                            -मानस६


दिवसभर हा चेहरा हसराच असतो
आसवांची रात्रपाळी...नेहमीची

खूपच छान कल्पना आहे
लिहित रहा..........

दिवसभर हा चेहरा हसराच असतो
आसवांची रात्रपाळी...नेहमीची
वा, क्या बात है.
जनार्दन, गझल जमून आली आहे. फार आवडली.

पिंपळाचे पान... हे आयुष्य माझे
तू उगा जपतेस जाळी...नेहमीची
आणि
वेदनेवरची झटकतो राख माझ्या
म्हणुन गझलेला झळाळी... नेहमीची
 शेर आवडले.  
         

प्रिय जनू,

दिवसभर हा चेहरा हसराच असतो
आसवांची रात्रपाळी...नेहमीची

वेदनेवरची झटकतो राख माझ्या
म्हणुन गझलेला झळाळी... नेहमीची

हे शेर आवडले - बापू

सिगारेट सारखी वेदना झटकणे - व्वा चांगली कल्पना - बापू

 

उधळुनी अंधार जनतेच्या नशीबी
राज्यकर्त्यांची दिवाळी...नेहमीची
वा... वा... क्या बात है.....
पिंपळाचे पान... हे आयुष्य माझे
तू उगा जपतेस जाळी...नेहमीची
हा शेर पण मस्त.........

उधळुनी अंधार जनतेच्या नशीबी
राज्यकर्त्यांची दिवाळी...नेहमीची

वा वा, जनार्दन थेट बोलला आहेस.

आणि,

वेदनेवरची झटकतो राख माझ्या
म्हणुन गझलेला झळाळी... नेहमीची

ही झळाळी पण उजळून आली आहे.

वा वा!
झळाळी,जाळी,रात्रपाळी विशेष.
लगे रहो.

पिंपळपान, रातपाळी इतकेच नाविन्य बाकी सगळी नेहमीचीच साखळी
अर्थात एकंदर गझल चांगली आहे यात शंका नाही

आत्म्स्तुती.. काय ते कळले नाही..

पिंपळाचे पान... हे आयुष्य माझे
तू उगा जपतेस जाळी...नेहमीची

यातील भाव कोणताही असला तरी एकदम बालपणच आठवले. धन्यवाद.

झळाळी डोळे उघडवणारा बाण, गझलकारांचे!
पिंपळ - चाटून जाणारा बाण! मनाला

अशी प्रतिक्रिया का बरे..

हे खूपच आवडले...

सु॑दर....
दिवसभर हा चेहरा हसराच असतो
आसवांची रात्रपाळी...नेहमीची
दिवसभर हा चेहरा हसराच असतो
आसवांची रात्रपाळी...नेहमीची
वेदनेवरची झटकतो राख माझ्या
म्हणुन गझलेला झळाळी... नेहमीची

अतिशय सुन्दर गझल............
                                 शुभचिन्तक

वेदनेवरची झटकतो राख माझ्या
म्हणुन गझलेला झळाळी... नेहमीची
फार फार आवडला...

सर्वांना मनापासून धन्यवाद.....