मी न माझा राहतो

भासतो वेडा जो माझ्या यायला घरी चाहतो १
राहतो तेथे मी जेथे मी  न माझा राहतो२

दचकतो अन थबकतो मग निरखतो माझी प्रिया
मारुनि डोळा मला मग गार वारा वाहतो

चालणे जमतेय की मज न्यायला घरी लागते
घ्यायला बसल्यावरी कोण इतके पाहतो३

प्रेम, अनुभव, अश्रु, मदिरा, कल्पना, प्रतिभा जरा
खूब वर्षावात यांच्या शेर माझा नाहतो

वेळ ना घेताच आम्ही भेटतो, ना त्रासतो
साहते कविता मला कधि मी तिलाही साहतो


[१,२, ३ ह्या ओळीत बदल करावेत, ही विनंती. इतर ओळींप्रमाणे राधिका ताराप गा, राधिका ताराप गा(किंवा गालगागा, गालगागा, गालगागा, गालगा) ह्या वृत्तात असायला हव्यात.--विश्वस्त]

गझल: