कुणी इथे

अता नाही तसे कुणी इथे
तरी गाली हसे कुणी इथे ?

अशा ताज्या अजूनही खुणा
जसे पूर्वी फसे कुणी इथे

उभे वाटेत राहती जसे
बनूनीया ठसे कुणी इथे

मी नाही, ही फुलेच सांगती -
तुझ्याहुन छानसे कुणी इथे!

कसे रे आज गप्प हे झुले?
जसे काही नसे कुणी इथे

जरी अश्रू दिसे फुलांवरी
न दु:खी फारसे कुणी इथे

गझल: