तो क्षण

तो क्षण नव्ह्ता मेलेला
केवळ मागे गेलेला

आधी भोळा होता तो
नंतर चावट झालेला

बोलत बसला कितीतरी
थोडी बहुदा प्यालेला

स्वच्छ कवडसा इतका की
नुक्ता दवात न्हालेला

प्रेमाइतका संयमही
खूप खोलवर दडलेला

माणुस बुद्धी असताना
बेसुमार का व्यालेला

मरणाबद्दल विचार मी
जगण्याआधी केलेला


गझल: