हुडकतो मी




अलीकडे एवढ्यात थकतो मी
चकवावे कुणीही चकतो मी


मी तसा जाणकार नाही पण
तुज डोळ्यास वाचू शकतो मी


सूर्या दिवसपाळी देतो अन
रात्री एकटा भटकतो मी


मज दिसता मी लाख वर्षांनी
या बघण्या कसा थिरकतो मी


आलो पाहण्यात तर कळवा
केव्हाचा मला हुडकतो मी



गझल: 

प्रतिसाद

आलो पाहण्यात तर कळवा
केव्हाचा मला हुडकतो मी

या ओळी मला आवडल्या, पण त्याबरोबर असे सांगावेसे वाटते की
आपण थोडे थांबायला हवे, शब्दांसाठी तसेच कल्पनांसाठी ही...
आपले वाचन असेलच, पण तरी ही किमान भटांची गझल तसेच बाराखडी पहावी.
फायदा करून घेतला तर फायदा होईलच हे सांगायला नको...