कावळे घाटावरी...

...गझल...


काय मज होणार  हे त्यांना दिसाया लागले ,
कावळे घाटावरी ते घुटमळाया लागले...


मौनव्रत  धरला तयांनी आत्मशुद्धीला उगा,
काल झोपेतून तेही बडबडाया लागले...


भिन्नतेचा शाप घेऊनी तसा आलो जगी ,
सोडता जग, एकसे सारे दिसाया लागले !


हीन कर्मांनी खरोखर गाठली उंची अशी ,
बिंबही माझे , मला बुटके दिसाया लागले !


नाव मी लिहीता तुझे, भिंतीवरी, झाले असे...
मोडके ते घर अचानक, झगमगाया लागले !


ऐकली इतुक्यांदा मी 'देव' ही संकल्पना ,
वास्तवाशीही तिचे नाते जुळाया लागले !


...शैलेश कुलकर्णी...


   

गझल: