तेंव्हा..



वेदना माझ्या तिला कळतील  तेंव्हा
लाघवी डोळे मला बघतील    तेंव्हा...

स्वप्न फिरते सारखे डोळ्यात माझ्या 
हात हे हाती तिच्या असतील  तेंव्हा..?

आळ येइल पाखरावर कत्तलीचा
मज फुलांचे प्रेत ही दिसतील  तेंव्हा

वाटते जिंकून घ्यावे मी  जगाला
पण तिच्याशी हात हे लढतील  तेंव्हा ..?

ठेवुनी बघ ह्रुदय तू ह्रुदयात माझ्या
भावनेला स्पंदने कळतील  तेंव्हा..

             --------स्नेहदर्शन

गझल: 

प्रतिसाद


वेदना माझ्या तिला कळतील  तेंव्हा
लाघवी डोळे मला बघतील    तेंव्हा...

हा शेर सरळ असला तरी छान आहे. आवडला.  इतर द्विपदींवर काम करायला हवे असे वाटते. स्‍नेहदर्शन, पुढील गझलेसाठी मनापासून शुभेच्छा.

चित्तरंजन यांनी  म्हटल्याप्रमाणे शेरांवर काम करणे गरजेचे.
शेर अजिबात स्पष्ट नाहीत.
गझललेखनासाठी शुभेच्छा.

अर्थ छान-
वेदना माझ्या तिला कळतील  तेंव्हा
लाघवी डोळे मला बघतील    तेंव्हा...
= गूडलक

फारच छान ....
ठेवुनी बघ ह्रुदय तू ह्रुदयात माझ्या
भावनेला स्पंदने कळतील  तेंव्हा..
हा शेर विशेश...