हातच दगडाखाली माझे...

...गझल...


हातच दगडाखाली माझे ऐकुन ते घेणारही नव्हते ,
माझी परखड मते मांडणे आता परवडणारही नव्हते...


समजू शकतो , त्या वेड्यांनी काल तमाशा का केलेला ?
पचले नाही , दीडशहाणे , कुचके बडबडणारही नव्हते ?


दुःखे , चिंता , ईर्षा , त्रागा अन बदनामी पदरी , त्याच्या
परिणामांची यादी केली ,  जे आता घडणारही नव्हते !!


वीर शहीदाच्या थडग्यावर कचरा गोळा झाला होता ,
श्रेय लाटले त्या हिजड्यांनी ,जे युद्धे लढणारही नव्हते !!


दणके , फटके खाता त्यांचे मतपरिवर्तन झाले बहुधा ,
प्रेमाने , लाडीगोडीने , अक्कल ते शिकणारही नव्हते !!


माझ्या मुस्काटात लावल्या दोन झापडा मीच , कशाला
मुस्कटदाबी त्यांची केली ? जे काही म्हणणारही नव्हते !!


...शैलेश कुलकर्णी 


 


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

वीर शहीदांच्या थडग्यावर कचरा गोळा झाला होता,
श्रेय लाटले त्या हिजड्यांनी ,जे युद्धे लढणारही नव्हते !!
विदारक. ईतर शेर निट कळले नाहित.