डोळे
बघता बघता विझले डोळे
हसता हसता भिजले डोळे
आठवणींचे वादळ आले
एकाएकी थिजले डोळे
दु:खाला मी तासत गेलो
माझ्या नकळत झिजले डोळे
ह्या अश्रुंचे आधण झाले
आयुष्याचे शिजले डोळे
स्वप्नांचा हा जागरगोंधळ
नाही माझे निजले डोळे
गझल:
अता मी ऐकतो... तेव्हा जरा झंकारलो होतो
तसा झंकारतानाही कधी झंकारलो नाही!