... राहिलो मी
हातात पुष्पमाला सजवून राहिलो मी
हलकेच गाठ सुटता उधळून राहिलो मी
बस रोखण्यास गेलो, तिरप्या अनेक नजरा
निर्लेप आंत बसले, लटकून राहिलो मी
स्वच्छंद धुंद विहरू, सागर तटात गाऊ
प्रेमात भावनौका उलटून राहिलो मी
जगणे मधूर आहे, चाखू कसे कळेना
कडुनिंब पालवीला चघळून राहिलो मी
जीवन कसे जगावे? अर्थास मान आहे
देवाला एक सारे चुकून राहिलो मी
कैफात वाट वळुनी माडीवरी निघाली
चुकलो कसे कळाले उतरून राहिलो मी
आता कशास चिंता, सारे रिते असू दे
विश्वात एक तुजला मिळवून राहिलो मी
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शनि, 13/09/2008 - 09:55
Permalink
वाह
आता कशास चिंता, विश्वात एक तुजला मिळवून राहिलो मी! काय छान शेर!
कडुनिंब आणि माडी अप्रतिम कल्पना!
श्री अजय,
आपण सतत लिहावेत. समीरप्रमाणेच आपल्या गझला वाचून आनंद मिळतो.
आपल्या गझलांमधे मूड फार वेगळा असतो.