...अंदाज आगळा आहे!

देऊन कोहळा येथे मिळवला आवळा आहे


असा हा माझ्या जगण्याचा अंदाज आगळा आहे


 


तोडले कुणी कळले ना, ते पाश जखडणारे


जरासा बावरलो क्शणभर, पण अता मोकळा आहे


 


मोह तू पाडलास कितिही, 'विदेशी ' घेणारच नाही


लागते फक्त मला 'देशी' ....तसा मी सोवळा आहे


 


नसे आता पराक्रम तो, नसे उरली विजीगीषा


कधीचा मरून पडलेला येथला मावळा आहे


 


कशाला प्रार्थना त्याच्या? लढा आता स्वतः तुम्ही


सारखा यायला खाली देव का मोकळा आहे?


 


शेवटी एवढे कळले की मज काहिच ना कळले


व्यर्थ आयुष्य नासविले....किती मी बावळा आहे!

गझल: 

प्रतिसाद

सारखा यायला खाली देव का मोकळा आहे? - हा मिसरा फार आवडला अमोघ!