लपंडाव

वसंताचे नव्याने स्वर उमटले
डहाळीवर अचानक फूल फुलले


'नको पाहूस स्वप्ने तू उन्हाची'
दवाला मंद तार्‍याने विनवले


'नका बुडवू मला' मूर्ती म्हणाली
'पुन्हा या पुढिल वर्षी'बोल घुमले


नसे मजकूर कोरे पत्र त्याचे
न लिहिताही मला सारे उमजले


'़क्षितिज ओलांडले की गाव माझे'
ंम्रुगाने शेवटी वाळूस म्हटले


पुन्हा गुंतायचे नाहीच केव्हा
असे प्रत्येक वेळी मी ठरवले


तुझा जो प्रश्न होता तोच माझा
तुझे उत्तर मला नाहीच सुचले


लपंडावात हरले शब्द माझे
गझल सगळीकडे शोधून थकले


                           प्रमोद बेजकर


 

गझल: 

प्रतिसाद

वसंताचे नव्याने स्वर उमटले
डहाळीवर अचानक फूल फुललेछान...


नसे मजकूर कोरे पत्र त्याचे
न लिहिताही मला सारे उमजलेसुंदर


पुन्हा गुंतायचे नाहीच केव्हा
असे प्रत्येक वेळी मी ठरवलेअप्रतिम

तुझा जो प्रश्न होता तोच माझा
तुझे उत्तर मला नाहीच सुचले
वा...वा...

शुभेच्छा, प्रमोदराव...