''आसुसलेले झाड मी''

पानझडीनंतर फिरुन पुन्हा


मजवरी   श्रावण  बरसला


बहर माझ्या जीवनातील


पुन्हा मज आठवला ..!!


आसुसलेले  झाड  मी


फक्त एका वेलीला


उभा  असुनी  वनामध्ये


का  मी  असे  एकला..?!!


झेप  जरी  माझी  गगनी


कसा विसरेन  मी  तिला


लता  असुनी  कोमलशी


आधार जिने मला  दिला..!!


माझ्या  छायेऐवजी


छायेत घे मजला


प्रतिसाद  दे  ना


माझ्या शेवटच्या सादाला..!!


जीवन  दिलेले  देवाने


संपवणे  हाती  न माझ्या


वाटसरुंना विसरलो  तरी


आठवणी  असतील फक्त  तुझ्या..!!