आरसा

एवढीशी काच आहे आरसा
केवढा पण जाच आहे आरसा


मी कधीचाच फुटलो अन् बिखरलो
हा नवा कोराच आहे आरसा


ओळखीचे हासला नाही कधी
राहिला परकाच आहे आरसा

दूर ह्याला ठेव तू सखये बरे
हा जरा 'तसलाच' आहे आरसा

धनिक सारे रूपसुंदर  देखणे!
काय घेतो लाच आहे आरसा?

हासरा दिसलो कधी मी ज्यामधे
ना असा बनलाच आहे आरसा


 


(जयन्ता५२)

गझल: 

प्रतिसाद

मस्त गझल आहे जयंतराव! "तसलाच" - वा!
मतला अप्रतिम आहे.
एवढीशी काच आहे आरसा
केवढा पण जाच आहे आरसा
क्या बात है! खूप खूप आवडला हा शेर!!

एवढीशी काच आहे आरसा
केवढा पण जाच आहे आरसा
छान...जयंतराव.  आवडला तुमचा  हा आरसा.

एवढीशी काच आहे आरसा
केवढा पण जाच आहे आरसा

छान...जयंतराव.  आवडला तुमचा  हा आरसा.

मतला खरंच खूप छान आहे..
'काय घेतो लाच आहे आरसा...'  क्या बात है.....!

छान शेर आहेत्..

मी कधीचाच फुटलो अन् बिखरलो
हा नवा कोराच आहे आरसा..
सर्व शेर खुप सुन्द्दर आहेत पण हा जास्त आवडला