कशाला ?

ओळींचे जंजाळ कशाला..?
शब्दांची आबाळ कशाला..?

निर्मळ पाणी डोळ्यांमधले
अभिव्यक्तीचा गाळ कशाला..?

शांती ह्रदयातच शोधावी..,
फिरतो रानोमाळ कशाला...?

या भजनातच भक्ती नाही..!
..ढोलक आणिक टाळ कशाला..?

तो त्याच्या मरणाने मरतो..
यावा लागे काळ कशाला ?

बदफैली ही जातच ज्याची,
त्याला कुठली नाळ कशाला .?

सहवासाने फुलवू ह्रदयी,
चंद्राला आभाळ कशाला ...?

थार्‍यावरती नाही जे मन,
त्याचाही सांभाळ कशाला ..?

जगताना जे जळतच गेले,
त्या प्रेताला जाळ कशाला ..?

चाल तुझी...अन् ताल धरी मन,
..तुजला पैंजण, चाळ कशाला...?

मी तर कबुली देतो आहे..
तुमचे खोटे आळ कशाला ...?

                     - प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

मी तर कबुली देतो आहे..
तुमचे खोटे आळ कशाला ...?
वाव्वा... अगदी मस्त.

या भजनातच भक्ती नाही..!
..ढोलक आणिक टाळ कशाला..?
वाव्वा...

गझल आवडली संतोषराव..

किती सुंदर! 'निर्मळ डोळ्यामधले पाणी - अभिव्यक्तीचा गाळ', 'हृदयातला चंद्र', 'मनाचा सांभाळ', 'खोटे आळ', एकापेक्षा एक देखण्या कल्पना!
खूप आवडली गजल.
-सतीश

थार्‍यावरती नाही जे मन,
त्याचाही सांभाळ कशाला ..?
छान...छान...

मी तर कबुली देतो आहे..
तुमचे खोटे आळ कशाला ...?
उत्तम...
आळ हा शब्द माझ्याही खूपच आवडीचा बरं का :) अनेक कवितांमधून येतो बऱ्याचवेळा...! 

जगताना जे जळतच गेले,
त्या प्रेताला जाळ कशाला ..?

लोककवी मनमोहन नातू यांच्या त्या सुविख्यात ओळी  या शेरावरून आठवल्या...
शव हे कवीचे जाळू नको हो
जन्मभरी तो जळतचि होता
फुले तयावर उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतचि होता

मनःपूर्वक धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मनःपूर्वक . खूप दिवसांनी माझी गझल आणि तुमचा प्रतिसाद, असा योग आला.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मनापासून.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

सांभाळ, जाळ आणि आळ शेर आवडले! मतलाही २ र्‍या वाचनात फार फार आवडला - "शब्दांची आबाळ कशाला" वा वा!!

शांती ह्रदयातच शोधावी..,
फिरतो रानोमाळ कशाला...?

या भजनातच भक्ती नाही..!
..ढोलक आणिक टाळ कशाला..?

तो त्याच्या मरणाने मरतो..
यावा लागे काळ कशाला ?
 
प्रवाही आणि सहज गझल !

भक्ती , शब्दांची आबाळ हे दोन्ही शेर अतिशय आवडले.

गझल आवड्ली

अगदी मनापासून.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

सानंद ! मनापासून !!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०