वाटले बरे किती!

भेटती जपून टवटवीत चेहरे किती!
सोबतीस आणती सुगंध बोचरे किती!

मी अजून खरवडून चेहर्‍यास पाहतो
ह्या चर्‍यांशिवाय आत आणखी चरे किती?

प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?

झोपड्यांत राहती गुरे म्हणे समोरच्या
आलिशान सदनिकांत ह्या जनावरे किती?

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?

"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती!

घाव दाखवून मी तुझ्यासमोर नागडा
अन् तुला फिकीर लोंबतात लक्तरे किती?

चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?

गझल: 

प्रतिसाद

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?
वा...वा....वा...
अप्रतिम गझल.
प्रत्येकच शेर खणखणीत. जोरदार. कोणत्या कोणत्या शेरांचा उल्लेख करावा ?
गझल लिहावी, तर अशी लिहावी !!!

क्या बात है! मीही हेच म्हणतो. लाजवाब.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मुशायर्‍यात ही गझल ऐकताना एका एका शेरामुळे अंगावर काटा येत होता. मस्त!! बहोत ही बढिया!!!

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?
...अप्रतिम !

अप्रतिम गझल आहे!
चरे, ऋणानुबंध, लक्तरे आणि अक्षरे हे शेर विशेष आवडले.
लक्तरे वाचताना - "चिपक रहा है बदनपर लहू से पैराहम.." या गालिबच्या अप्रतिम शेराची आठवण झाली!!

अप्रतिम..! 
सगळे  शेर आरपार..!

मी करु अजून पार सांग अंबरे किती ?.......हे कस वाटत?

वा! लाजवाब!
घाव दाखवून मी तुझ्यासमोर नागडा
अन् तुला फिकीर लोंबतात लक्तरे किती?
हा खूपच आवडला! अप्रतिम गझल चित्तसाहेब!

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?

खूप दिवसांनी नविन गझल वाचायला मिळाली...
वाटले बरे किती...

मी करु अजून पार सांग अंबरे किती ?..
चांगले वाटते आहे. पण अजून ला अद्याप आणि आणखी अशा दोन्ही छटा नाहीत इथे, असे वाटते. विचार करतो आहे.

भेटती जपून टवटवीत चेहरे किती!
सोबतीस आणती सुगंध  बोचरे किती!
... वर्तमान परिस्थिती

चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?
.... भविष्याची वाटचाल

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?
..... भविष्याची जाणीव
प्रत्येक कवीने कधीतरी स्वतःला विचारावे असे प्रश्न.

सगळी गझलच अप्रतीम झाली आहे.
 ऋणानुबंध तर खासच.
ऐकवणार केव्हा आम्हाला?
 
--योगेश वैद्य.

वा वा वा वा,
क्या बात है! अप्रतिम गझल. हार्दिक अभिनंदन.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आवड्ली यार  : बापू दासरी

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?

सुंदर शेर

प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?
                      वा वा वा* वा* बहोत बहोत बहोत बहोत  बढिया
  
अप्रतिम आहे मी आज पर्यंत असा शेर कधीच वाचला नाही

 

मी अजून खरवडून चेहऱ्यास पाहतो
ह्या चऱ्यांशिवाय आत आणखी चरे किती?  क्या बात हे..........

मी अजून खरवडून चेहऱ्यास पाहतो
ह्या चऱ्यांशिवाय आत आणखी चरे किती?
प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?
गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?
घाव दाखवून मी तुझ्यासमोर नागडा
अन् तुला फिकीर लोंबतात लक्तरे किती?

गझल खास आहेच , वरील शेर विशेष आवडले - बापू

चित्त,
बर्‍यांच दिवसांनी तुमची गझल वाचली. सगळेच शेर आवडले.
'वाटले बरे किती' - वा! वा!..'चरे', 'बोचरे' हे शेर वेगळे आहेत आणि सुंदरही.
मक्ताही आवडला.
- कुमार

अप्रतिम गझल...!! सारेच शेर आवडले..त्यातही हे फारच.


मी अजून खरवडून चेहर्‍यास पाहतो
ह्या  चर्‍यांशिवाय आत आणखी चरे किती? (जबरदस्त शेर..!!)

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती? (वा..!!हा शेर आज दिवसभर मनात घोळत राहिल.)


"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती! (सहज, सुंदर शेर..)

अप्रतिम गझल! सगळेच शेर जबरदस्त.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

झोपड्यांत राहती गुरे म्हणे समोरच्या
आलिशान सदनिकांत ह्या जनावरे किती?ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती!

हे तीन शेर सपाट वाटले !

पण . . .

मी अजून खरवडून चेहर्‍यास पाहतो
ह्या  चर्‍यांशिवाय आत आणखी चरे किती?

लाजवाब !!

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?

अत्यंत मोलाचा शेर !!

प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?

क्या बात है जनाब !!

पुन्हा पुन्हा कुठून सांग आणतोस गारवा ?
चित्तरंजना तुझ्या उरामध्ये झरे किती ??

असे विचारावेसे वाटते !

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

अप्रतिम गझल.

गझल छान आहेच....
पण आपण कोणतीही गझल टाकली तरी एवढे अभिप्राय मिळतातच कसे..?

देवा..
मी  "कर"असतो तर....

सुरेख गझल.

हे शेर आवडले.

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती? -यावर वन्स मोर व रिपीट केले :-))

तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?
चार शब्द बोललीस वाटले बरे किती

चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?

नागडा, लक्तरे व चेहरा खरवडणे हे उल्लेख मला रसभंग करणारे वाटले. क्षमस्व!

ब-याच दिवसांनी नवीन गजल,

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?

"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती!

चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?>>> हे शेर जास्त आवडले.

चित्तरंजनजी,
लाजवाब गझल्.......सगळेच शेर छान आहेत.....पण खालिल शेर विषेश आवडले...

भेटती जपून टवटवीत चेहरे किती!
सोबतीस आणती सुगंध बोचरे किती!

"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती!

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?

वाह वाह्.....आफरीन......
` खलिश ' - विठ्ठल घारपुरे/११-०८-२००९.

क्या बात है !!!!!! मजा आ गया.

घाव दाखवून मी तुझ्यासमोर नागडा
अन् तुला फिकीर लोंबतात लक्तरे किती?

झोपड्यांत राहती गुरे म्हणे समोरच्या
आलिशान सदनिकांत ह्या जनावरे किती?

हे दोन शेर अप्रतिमच. पूर्ण गझल मनाला भिडणारी
वा !

प्रसाद.

ब-याच दिवसांनी नवीन गजल,

श्यामली, गझल तशी जुनीच आहे.

नागडा, लक्तरे व चेहरा खरवडणे हे उल्लेख मला रसभंग करणारे वाटले. क्षमस्व!

भूषण, क्षमायाचना कशाला? पुन्हा एकदा प्रयत्न करा. कदाचित रसभंग होणार नाही.

ही गझल वाचणाऱ्यांचा आणि प्रतिसाद देण्याऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.

चित्तरंजन,

ते दोन शेर आणखीन काही वेळा वाचले. लक्तरे या शेराचा अर्थ फार सुरेख आहे व मला तरी तो अनेक अर्थाचा वाटला. असेही वाटले की नागडा या शब्दाची छटा इतर शब्दात येणे अवघड आहे, पण तरी 'नागडा' या शब्दाला पर्याय देता येईल काय असे मनात येत राहिले.

मी अजून खरवडून चेहर्‍यास पाहतो
ह्या चर्‍यांशिवाय आत आणखी चरे किती?

हा शेर खूपच सहज आला. पण यात 'अजून' या शब्दाचे महत्व लक्षात आले नाही. आपण 'अजून' हा शब्द का घेतलात ते कृपया कळावे.

( बाकी : - टवटवीत चेहरे पासून सुरु होणारी ही गझल पूर्णच सुंदर आहे. व्यक्तिगतरीत्या काही उल्लेख भिन्न जातीचे वाटले इतकेच म्हणायचे होते. तसेच, शेर अनेक वेळा वाचल्यावर वेगवेगळा आनंद मिळणे हा एक अनुभव आला. यापुढे मी इतरही गझलकारांचे शेर अनेक वेळा वाचून प्रतिसाद द्यावेत असे मनात आले.)

आभारी!

क्लास !

आज पुन्हा ही गझल वाचली. अतिशय आवडली.

सुगंध बोचरे,
प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-

अतिशय सुरेख, सुंदर, आणि वास्तव कल्पना.

घाव दाखवून मी तुझ्यासमोर नागडा
अन् तुला फिकीर लोंबतात लक्तरे किती?

चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?

अप्रतीम गझल...

मी अजून खरवडून चेहर्‍यास पाहतो
ह्या चर्‍यांशिवाय आत आणखी चरे किती?

प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?

झोपड्यांत राहती गुरे म्हणे समोरच्या
आलिशान सदनिकांत ह्या जनावरे किती?

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?

.............अप्रतीम..............................

चांगली आणि बोल्ड गजल वाटली.
म्हणतानाही मजा येते आहे.

अप्रतिम !!
असं काही वाचलं की दिवसाची सुरवात खूप छान होते :) जबरदस्त !!

करारनामेच्या खालोखाल दोन क्रमांकाचे सर्वाधिक प्रतिसाद असलेली गझल!

गझल सुरेख आहेच.

अजून येऊद्यात.

अप्रतिम गझल.
सर्वच शेर मस्त.

ह्म्म्म्म्म्म.........क्या बात है !!!

डॉ.कैलास

प्रिय चित्तरंजन,
ग्रेट-
घाव दाखवून मी तुझ्यासमोर नागडा
अन् तुला फिकीर लोंबतात लक्तरे किती?
या शेराला काय दाद देणार. पचवत जायचा शेर. हा शेर वाचल्यावर पुढचं वाचूच नये असं वाटतं. बस्स नको. थांबा पहिले हे समजून घेतो पचवतो नीट त्यातून बाहेर येतो मग पुढचे बघू यात.....
-२८ मार्च
.....
मस्तच
चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?
अतिशय सुंदर गझल!!!
-29 मार्च

सुंदर गझल....आणखी काय म्हणणार!

आवडलेला शेर :

प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?

अहा!
ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?

"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती!

चित्तरंजन,
आज पुन्हा तुझ्या काही गझला वाचल्या. काही शेर पुन्हा पुन्हा आठवत राहिले!

सोनाली

आवडलेला शेर:

गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?

व्वा!
फारच सुंदर
सगळेच शेर आवडले
तिसरा कुंपणाचा शेर पहिल्या वाचनात लक्षात नाही आला
दुस-यांदा वाचला तेंव्हा कळला
राहतात माणसे (ज्यांत)अशी घरे इथे किती?
रामकुमार

अप्रतीम गझल...
ये ब्बात....
अशा रचना वाचल्या म्हणजे गझलेची खुमारी वाढतच जाते...
चित्तरंजनजी बहोत खुब...

चित्तरंजन..... वा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Pages