...का असे?

हा अबोला, हे दुरावे...का असे?
जवळ तू अन् मी झुरावे...का असे?


प्रीत माझी मोहरे गाली तुझ्या
मागशी तरिही पुरावे...का असे?


बीज स्नेहाचेच पडले, त्यातुनी
संशयाने अंकुरावे ...का असे?


ठेवला मी साज खाली आणि तू
ऐकण्याला आतुरावे...का असे?


रोख भरले श्वास मी रोज तरिही
व्याजही थोडे उरावे...का असे?


काय मी नसणार उद्याला?...उगा
काळजाने काहुरावे...का असे?


 


(जयन्ता५२)

गझल: 

प्रतिसाद

हा अबोला, हे दुरावे...का असे?
जवळ तू अन् मी झुरावे...का असे?
मतला छान आणि सफाईदार आहे! इतर शेरांतही अशीच सफाई आल्यास बहार येईल. पण आधीपेखा खूप सुधारणा आहे.