गारवा..!कुंद या हवेत दाटलाय गारवा..
मज तरी असा कुठे हवाय गारवा ?


हे जळावरी कशास दाटले धुके,
रूप न्याहळीत गुंतलाय गारवा..


लोकरीत अंग सर्व झाकुनी कसा,
आज तो विचारतो कुठाय गारवा..


पांघरून शाल मी सुखात राहिलो
मज कुठे अजून झोंबलाय गारवा ?


रात चंद्रपावलात थांबली तिथे.
सोबतीस आज थांबलाय गारवा..


गारठून एकटे कशास जायचे ?
ये मिठीत बघ पळून जाय गारवा..!


                            --   अभिजीत दाते

गझल: 

प्रतिसाद

हे जळावरी कशास दाटले धुके,
रूप न्याहळीत गुंतलाय गारवा..
छान...
१) चंद्रपाऊल हा शब्द चांगला आहे...पण त्या शब्दामुळेच तो शेर संदिग्ध झाला आहे.  नवे शब्द जरूर जरूर तयार करावेत , वापरात आणावेत,  पण त्यातून संबंधित कवितेचा, गझलेचा, शेराचा अर्थ  पुसट  न होता ठळक  व्हावा,  सघन व्हावा, आशयघन व्हावा.
२) `मायबोली`  या संकेतस्थळावरील  कितीसा...!  हीही तुमची गझल वाचली.  आवडली.
३)  गझलेत जो ओघ असावा लागतो, तो  ओघ, सहजपणा तुमच्या गझलेत आहे.   वृत्तावरही तुमची  हुकमत आहे, पण केवळ वृत्तातच अडकून पडू नका.  गझलेतील काव्याकडे अवश्य लक्ष द्या.  काव्य, कवित्व फार फार महत्त्वाचे.  सहज आठवले म्हणून येथे नमूद करतो  - Learn technique, master technique  and...and forget technique !

१) चंद्रपाऊल हा शब्द चांगला आहे...पण त्या शब्दामुळेच तो शेर संदिग्ध
झाला आहे.  नवे शब्द जरूर जरूर तयार करावेत , वापरात आणावेत,  पण त्यातून
संबंधित कवितेचा, गझलेचा, शेराचा अर्थ  पुसट  न होता ठळक  व्हावा,  सघन व्हावा, आशयघन व्हावा.
२) `मायबोली`  या संकेतस्थळावरील  कितीसा...!  हीही तुमची गझल वाचली.  आवडली.
३)  गझलेत जो ओघ असावा लागतो, तो  ओघ, सहजपणा तुमच्या गझलेत आहे.  
वृत्तावरही तुमची  हुकमत आहे, पण केवळ वृत्तातच अडकून पडू नका.  गझलेतील
काव्याकडे अवश्य लक्ष द्या.  काव्य, कवित्व फार फार महत्त्वाचे.  सहज
आठवले म्हणून येथे नमूद करतो  - Learn technique, master technique 
and...and forget technique !हेच म्हणीन. २ रा आणि ३ रा शेर छान आहे..

दाटलाय, हवाय, गुंतलाय अशी यमके सध्यातरी (येणाऱ्या काळाचे माहीत नाही) कानांना खटकतात. एखाद्या ठिकाणी अशी क्रियापदे  वापरणे   ठीक आहे...गझल प्रवाही झाली आहे.अभिनंदन. शेर लिहितांना, या जमिनीमधे  अर्थांच्या आणखी काही संभावना पडताळून पाहता येतील का ,याचा विचार केल्यास , गझला अधिक व्यापक स्तरावर जातात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.