ताजमहल

जे जे केले होते दावे....
खोटे ठरले सर्व पुरावे...


गोड गळ्यांनी टाळ कुटा अन;
बेसुर्‍यांनीच गीत म्हणावे.


दिवसा ढवळ्या सक्त पहारा;
रात्रीला मोकाट फिरावे.


बोल जराशी तू प्रेमाने;
सहज येतील जवळ दुरावे.


ताज महल मी आज बांधतो;
आधी तू मुमताज बनावे.


सांग नशिबा मला एवढे;
फुकट तुला मी का पोसावे.


देव अचानक पेटुन उठला;
मी म्हटले तू काम करावे.

                   -अभिषेक उदावंत
             संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला.
              मो. नं. ९९२२६४६०४४

गझल: 

प्रतिसाद

राग नसावा, पण तुमच्या बाग आणि जाहिराती या गझलांच्या तुलनेत ही रचना थोडी कच्ची वाटते. लय, सफाई आणि आशय या सर्वच बाबतीत. चू.भू.दे.घे.
नशीब आणि देव शेरातल्या कल्पना मात्र आवडल्या!

 पुलस्तिजी सदर रचना ही एकतर बाग आणि जाहिरात या गझलांच्या तुलनेत लय, सफाई आणि आशय या सर्वच बाबतीत  थोडी कच्ची असावी,किंवा कदाचीत त्यातील सरळ ,सोपा ,साधा अर्थ आपल्यापर्यंत पोहचला नसावा. असं मला वाटते राग मानू नये सविस्तर चर्चा होने अपेक्षीत. चू.भू.दे.घे.

चांगले पोटेंशियल असणार्‍या अस्पष्ट, अधुर्‍या कल्पना, ओळी. ताजमहालाच्या शेराची कल्पना चावून चोथा झालेली आहे.