ययाती

बांधूनही मनोरे ,किर्ती  कथेत नाही.....
इतिहास सांगतो हा ,स्वप्नात नेत नाही.....


छातीत वेदनांचे, भरपूर पीक येते
डोळ्यात आसवांचा ,पाऊस येत नाही


तारुण्य मागणारा ,शापीत मी ययाती
माझीच देवयानी ,माझ्या कवेत नाही


नशिबा विचार कसला, करतोस नेहमी तू
झोळीत दान माझ्या ,काहीच येत नाही


उपवास देवतांचे, मी काल खूप केले
कुठ्लाच देव येथे, ऐकून घेत नाही


प्ल्यास्टीक सर्जरीने ,माणूस हा बदलतो
बदलून या मनाला ,कोणीच देत नाही


                        -मनोज सोनोने
                      आदर्श कॉलनी, अकोला.
                      मो. नं. ९९२१५४३२३१

गझल: 

प्रतिसाद

छातीत वेदनांचे, भरपूर पीक येते
डोळ्यात आसवांचा ,पाऊस येत नाही
वा, मनोज!

धन्यवाद....... भट साहेब!
                 आपल्या प्रतिसादाचीच
                               अपे़क्शा होती......

छातीत वेदनांचे, भरपूर पीक येते
डोळ्यात आसवांचा ,पाऊस येत नाही

अहाहाहा...ं निव्वळ अप्रतिम असा शेर!
नशिबा विचार कसला, करतोस नेहमी तू
झोळीत दान माझ्या ,काहीच येत नाही

वावा...सुंदर!
उपवास देवतांचे, मी काल खूप केले
कुठ्लाच देव येथे, ऐकून घेत नाही

मस्तच!
हे शेर फारच आवडले.
पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

 
वा मनोजराव,
ग़ज़ल आवडली.  सुंदर मांडणी. प्रत्येक शेर सुंदर आहे.
शेवटच्या शेरातील "प्लास्टिक सर्जरी" खटकली.  वरच्या पाच शेरांची उंची या शेरात नाही. 
ग़ज़लेत आलेले इंग्रजी शब्द दाताखाली भातातला खडा यावा तसे आम्हाला खटकतात.
याचे कारण आमच्यात असलेला बुद्धिमत्तेचा अभाव हे असू शकेल.
जे वाटले ते सांगितले. राग मानू नये. कोकणी फटकळपणा घेऊन आम्ही जन्माला आलो आणि इथून जातांना तो आमच्यासोबत घेऊन जाऊ.  दुखावण्यासाठी लिहिलेले नाही. प्रामाणिकपणे वाटले ते मांडले.
वेषा नाही बोल  ।  अवगुणा दूषिले......असो.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धन्यवाद्.....
               चक्रपाणिजी ....... आपल्या मत विशेश आवडले.
 धोंडोपंत साहेब आपलेही मत जाणुन बरे वाटले,
पण .......
पण प्लास्टिक या शब्दाला पर्यायी शब्द आहे का?,क्रुपया असल्यास सूचवावे, दुसरे म्हणजे सर्जरी हा शब्दाशिवाय शल्यचिकित्सा शब्द शास्त्रिय भाशेत झाला नसता काय? थोडक्यात असे वाटते. `दुखावण्यासाठी लिहिलेले नाही. प्रामाणिकपणे वाटले ते मांडले.`
                                          चुक भुल देणे घेणे.....

छातीत वेदनांचे, भरपूर पीक येते
डोळ्यात आसवांचा ,पाऊस येत नाही


नशिबा विचार कसला, करतोस नेहमी तू
झोळीत दान माझ्या ,काहीच येत नाही

हे दोन शेर अतिशय आवडले.