मारवाही शेवटी...

मारवाही... शेवटी... मंदावला
भैरवीचा सूर... आहे लागला

मैफिलीचा ताल गडबडला असा
केरवा, झपताल.. एकच वाटला

कोणती बंदीश गाते...? जिंदगी
षड्ज मज अद्याप नाही गावला

जीवना हा राग आहे कोणता ?
वेदना कवळून जो.. मी गायला

बोल ह्रदयीचा तुझ्या मी ऐकला
जो समेवर... मंद थोडा वाजला

मी प्रयासाने खुलवला जोगिया
पण गळ्याशी हुंदका हा दाटला

- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

केरवा, झपताल, जोगिया, सम, मारवा, बंदिश...वाव्वा..रागदारीवर आधारित गझल आवडली, जनार्दन.
कोणती बंदीश गाते...? जिंदगी
षड्ज मज अद्याप नाही गावला
वा!

बोल ह्रदयीचा तुझ्या मी ऐकला
जो समेवर... मंद थोडा वाजला
वा!

लय तुटते आहे असे वाटल्यामुळे शेवटच्या शेरातला खालच्या ओळीतला पण हुंदक्यानंतर टाकून वाचला. 


कोणती बंदीश गाते...? जिंदगी
षड्ज मज अद्याप नाही गावला

मी प्रयासाने खुलवला जोगिया
पण हुंदका हा गळ्याशी दाटला
ही चूक माझीच..
आता सुधारतो आहे..

मी प्रयासाने खुलवला जोगिया
पण गळ्याशी हुंदका हा दाटला

चांगली गझल  !

खुप छान गझल आहे......

संगीतमय/रागमय गझल. फार आवडली.
कोणती बंदीश गाते...? जिंदगी
षड्ज मज अद्याप नाही गावला

क्या बात है! मस्त!
- चक्रपाणि जीवन चिटणीस