ऋतू कोणता

 

 न उष्मा, न थंडी,न बरसात आहे
ॠतू कोणता आसमंतात आहे?


तुझ्यावीण सोसू कशी पोर्णिमा ही?
फिका चन्द्र आहे,सुनी  रात आहे


किती सुन्न साऱ्याच संवेदना या
जणू जिंदगी  दीर्घ कोमात आहे


अता थांबवू ,जीवना ,ही  लढाई
तुझी हर घडीला नवी मात आहे


विखुरले जरी लाख तुकडे मनाचे,
तुझा भास प्रत्येक तुकड्यात आहे
 

 

 


 

 

 

 

 

गझल: 

प्रतिसाद

किती सुन्न साऱ्याच संवेदना या
जणू जिंदगी  दीर्घ कोमात आहे

.. कोमा..चा प्रयोग्..स्वागतार्ह आहे

-मानस६

न उष्मा, न थंडी,न बरसात आहे
ॠतू कोणता आसमंतात आहे?
क्या बात है ...

कोमा आणि तुकडे हे शेर विशेष आवडले!