कळेल का कुणा ॠणानुबंध...

कळेल का कुणा ॠणानुबंध आपुले कसे
असून सावलीत मी उन्हात बैसले कसे


दवात न्हात राहिले, दवात गात राहिले
झुल्यावरी फुलांपरी मनात डवरले कसे


कपोल गाल, ओठ लाल लाजता उषेपरी
गुलाब गंध प्राशुनी ह्रदय गुलाबले कसे


सुगंध गंध पल्लवीत श्वास्-श्वास गंधता
इथे-तिथे तुझेच सांज रंग उधळले कसे


सखाही तूच, तूच मित्र, तूच जिवलगा तरी
कशास मज विचारता, अखेर भाळले कसे


-  दीपा

गझल: