पाप
मला एवढे पाप करु द्या शेवटचे
जमले ना अद्याप करु द्या शेवटचे
नाटक आहे तिसरा अंक जगण्याचे
होई आपोआप करु द्या शेवटचे
धाडस म्हणता लढण्यालाच एकाकी?
जगू द्यात संताप करू द्या शेवटचे
नाही राहिले गाणे तुमच्यासाठी
आतआत आलाप करु द्या शेवटचे
तिलाही अवघड नाही निरोप घेणे
नकोच आता ताप करु द्या शेवटचे
सूर्य सांगे शाप उगवणे,मावळणे
हवा हवा उ:शाप करु द्या शेवटचे
गझल: