भेटण्याचे राहिले

जीवनाशी  भेटण्याचे राहिले
बंध अमुचे बांधण्याचे राहिले

पावसाळे यायचे अन जायचे
गीत माझे पेरण्याचे राहिले

ती  व्यथांना माझिया सोसायची
दु:ख माझे पाहण्याचे राहिले

हरवलो तुमच्यामधे मी  येवढा
मी स्वत:ला  शोधण्याचे राहिले

मी  सदा हसणार होतो जीवनी
आसवांचे थांबण्याचे राहिले


  

गझल: 

प्रतिसाद

पावसाळे यायचे अन जायचे
गीत माझे पेरण्याचे राहिले

ती  व्यथांना माझिया सोसायची
दु:ख मझे पाहण्याचे राहिले.. हे दोन्ही शेर आवडले
-मानस६

पावसाळे यायचे अन जायचे
गीत माझे पेरण्याचे राहिले
ती व्यथांना माझिया सोसायची
दु:ख मझे पाहण्याचे राहिले.. हे दोन्ही शेर आवडले
असेच म्हणतो !!!!

दर्शन छान, सफाईदार गझल आहे.
ती  व्यथांना माझिया सोसायची
दु:ख माझे पाहण्याचे राहिले
हा शेर विशेष आवडला.

हे २ शेर खूप आवडले!

पावसाळे यायचे अन जायचे
गीत माझे पेरण्याचे राहिले

ती  व्यथांना माझिया सोसायची
दु:ख माझे पाहण्याचे राहिले
क्या बात है...
गीत माझे पेरण्याचे राहिले...