वर्षे झाली

 


        त्या जागेवर ती दिसण्याला वर्षे झाली
        तिने फक्त माझे असण्याला वर्षे झाली


                       गर्दीतुनही तिथे अचानक तिने स्वतःहुन
                        नांवगांव माझे पुसण्याला वर्षे झाली


        कुठे तुझे गं मावळले ते रुसणे फुगणे
        अशा तुझ्याही मग नसण्याला वर्षे झाली


                          ओळख देऊन पुन्हा चौकशी हसता हसता
                          ठरलेल्या माझ्याही फसण्याला वर्षे झाली 


        नवा शब्द होता माणुसकी,अर्थही त्याला
        नव्हे,मनावर हे ठसण्याला वर्षे झाली


                           झाडाखाली बसण्याऱ्याला मिळे सावली?
                           विश्वास कुणावर बसण्याला वर्षे झाली

गझल: 

प्रतिसाद

स्वागत....योगेश या संकेतस्थळावर.
गर्दीतूनही तिथे अचानक तिने स्वतःहुन
नांवगांव माझे पुसण्याला वर्षे झाली
वा...वा... फारच छान.
वाद नको   हीही गझल ठीक.

 त्या जागेवर ती दिसण्याला वर्षे झाली

गर्दीतूनही तिथे अचानक तिने स्वतःहुन
नांवगांव माझे पुसण्याला... वर्षे झाली
बहूत खूब..
मतल्यातील सानी मिसरा अस्वस्थ करतो आहे...
ती फक्त आपलीच असावी या अर्थाने...
म्हणून लिहिला नाही...

गझल आवडली.. सर्वच शेर छान! नावगाव हा शेर विशेषच!!

शेवटच्या द्विपदीतल्या दुसऱ्या ओळीत (वृत्तात बसण्यासाठी) योग्य ते बदल करावेत.  उच्चारानुसार शब्द ऱ्हस्व दीर्घ लिहावेत. "कुठे तुझे ग मावळले ते रुसणे फुगणे" ह्या ओळीतील ग चा पुनर्विचार करावा, ही विनंती.