ना ठावुक तुजला...

ना ठावुक तुजला कितीक कळतो आहे
जो दाह तुझा मज अविरत छळतो आहे


चालली जणू ही... माझी अग्निपरीक्षा
मी काय सिद्ध करण्याला जळतो आहे


तू समजुन घे ना.. माझ्याही शब्दांना
जे तुला वाटती... उगा बरळतो आहे


थांबवू कसा हा.. आठवणींचा ओघळ
जो डोळ्यांमधुनी घळघळ गळतो आहे


हा अथांग सागर माझे इप्सित असुनी
मी उगाच... काठावर डुचमळतो आहे


घे छळुन.. प्राक्तना, हवे तेवढे आता
पाहू दे, मला तू किती उधळतो आहे


सुर्याला पाहून... दूर निराशा गेली
मी पुन्हा उगवण्यास्तव मावळतो आहे


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

म्हात्रेसाहेब, अप्रतिम गझल. खूप आवडली. याही आधीच्या तुमच्या गझला वाचल्या . त्याही आवडल्या.  येथे आपले स्वागत आहे...!

तू समजुन घे ना.. माझ्याही शब्दांना
जे तुला वाटती... उगा बरळतो आहे


थांबवू कसा हा.. आठवणींचा ओघळ
जो डोळ्यांमधुनी घळघळ गळतो आहे


हा अथांग सागर माझे इप्सित असुनी
मी उगाच... काठावर डुचमळतो आहे

 

फारच छान!!

सुर्याला पाहून... दूर निराशा गेली
मी पुन्हा उगवण्यास्तव मावळतो आहे

हा शेर विशेष वाटला,

या साइटवर आता मी पण आहे.