कोलाहलात सार्‍या कोणी अबोल आहे

कोलाहलात सार्‍या कोणी अबोल आहे
जरि बोलतात डोळे कोणास मोल आहे?

काही नवे रुजावे काही नवे फुलावे
वैराण वाळवंटी हे स्वप्न फोल आहे

तुडवित रुक्ष वाटा आयुष्य व्यर्थ गेले
जरि नेत्र कोरडे हे हृदयात ओल आहे

सांभाळुनी निघालो, समजून एकमेका
हातात हात तरिही सुटतोच तोल आहे

येथे उदंड झाले, गद्यातले मनोरे
गझलेत शब्द थोडे पण अर्थ खोल आहे

गझल: 

प्रतिसाद

काही नवे रुजावे, काही नवे फुलावे
वैराण वाळवंटी हे स्वप्न फोल आहे...सुंदर
तुडवीत रुक्ष वाटा आयुष्य व्यर्थ गेले
रि नेत्र कोरडे हे ह्रदयात ओल आहे... वा, वा

छान रचना. शुभेच्छा.

काही नवे रुजावे, काही नवे फुलावे
वैराण वाळवंटी हे स्वप्न फोल आहे...
चांगला शेर...