जीवनाशी जुंपली

जीवनाशी जुम्पली  आता लढाई
संपला तह अन सुरू ही हातघाई


मज दिसेना काय आहे त्या तळाशी
वेदनेची केवढी ही खोल खाई!


जे न उठते पेटुनी वणव्याप्रमाणे,
ते न असते रक्त,ती तर लाल शाई


जे प्रजेला भाकरी देऊ न शकले,
मारती ते ई-गव्हर्नन्स्ची बढाई


मानली नाही अजुन मी हार माझी
मी तुझ्याहुन, वेदने,आहे सवाई


     दिलीप पांढरपट्टे

गझल: 

प्रतिसाद

मानली नाही अजुन मी हार माझी
मी तुझ्याहुन, वेदने,आहे सवाई.. सही मक्ता आहे
-मानस६

जे प्रजेला भाकरी देऊ न शकले,
मारती ते ई-गव्हर्नन्स्ची बढाई
मानली नाही अजुन मी हार माझी
मी तुझ्याहुन, वेदने,आहे सवाई
सुंदर... !!! गझल आवडली....

जे प्रजेला भाकरी देऊ न शकले,
मारती ते ई-गव्हर्नन्स्ची बढाई..
चांगला शेर ! मात्र,
मानली नाही अजुन मी हार माझी
मी तुझ्याहुन, वेदने,आहे सवाई  आणि
जीवनाशी जुम्पली  आता लढाई
संपला तह अन सुरू ही हातघाई
दोन्ही शेर रिवायती वाटतात.

जे प्रजेला भाकरी देऊ न शकले,
मारती ते ई-गव्हर्नन्स्ची बढाई
मानली नाही अजुन मी हार माझी
मी तुझ्याहुन, वेदने,आहे सवाई
एकदम सवाई आहे...

रिन्द भाई,
बढिया कहा! कहते रहिये! मजा आली (ला) वाचताना.