तुला या शोधती तारा

तुला या शोधती तारा
तुझ्यासाठी झुरे वारा


पुन्हा वेडावला वारा
थबकला गंध जाणारा


नको जाऊ अशा रात्री
अरे, तू एकटा तारा


दिले धोके उजेडाने
पुसू या वाट अंधारा        

मला ना पेलवे आता
व्यथांचा कोण डोलारा!


      दिलीप पांढरपट्टे

गझल: 

प्रतिसाद

पुन्हा वेडावला वारा
थबकला गंध जाणारा
बहोत खूब...

जनार्दन्,आभारी आहे