नवा चंद्र


मी जिवाची अपुल्या चेतवुनी वात पुन्हा;
दाट काळोख पुसायास बसे गात पुन्हा

पाहिले वाकुन तू लाजत पाण्यावरती
दावला एक नवा चंद्र तलावात पुन्हा

पूर्ण गावात तुझ्या एक दिसेना पुतळा--
कोणता सांग तुझा धर्म तुझी जात पुन्हा?

या स्थळी शोध उद्या तू मिलनाची किरणे
चांदणे सांडुन जाईल इथे रात पुन्हा

योजना पारित होतील महालांकरिता--
लोक विस्थापित होतील प्रकल्पात पुन्हा

पाळले पोपट खातात हमेशा हुरडा--
शोधतो एक अम्ही घास कुटारात पुन्हा

तू नको न्हाउस पाण्यात खुले या प्रहरी---
लावते काय उभी आगच डोहात पुन्हा?

खुद्द वाऱ्यावर ज्याचे जगणे विस्कटले--
तो जगाचीच व्यथा बांधिल शब्दात पुन्हा !

मी कळ्या टाळुन काटे उचलाया फिरतो---
कोण देईल मला साथ प्रवासात पुन्हा ?


गझल: 

प्रतिसाद

जवरेसाहेब, चांगली गझल.
योजना पारित होतील महालांकरिता--
लोक विस्थापित होतील प्रकल्पात पुन्हा
वा! हा शेर नेहमी लक्षात राहील.

गजल आवडली.
खुद्द वाऱ्यावर ज्याचे जगणे विस्कटले--
तो जगाचीच व्यथा बांधिल शब्दात पुन्हा ! हा शेर विशेष.

अजब


पूर्ण गावात तुझ्या एक दिसेना पुतळा--
कोणता सांग तुझा धर्म तुझी जात पुन्हा?
व्वा !
ई-जगतात स्वागत !

प्रकल्प आणि जात - क्या बात है! हे शेर खूप आवडले!!

पाहिले वाकुन तू लाजत पाण्यावरती
दावला एक नवा चंद्र तलावात पुन्हा

या स्थळी शोध उद्या तू मिलनाची किरणे
चांदणे सांडुन जाईल इथे रात पुन्हा

योजना पारित होतील महालांकरिता--
लोक विस्थापित होतील प्रकल्पात पुन्हा

तू नको न्हाउस पाण्यात खुले या प्रहरी---
लावते काय उभी आगच डोहात पुन्हा?

खुद्द वाऱ्यावर ज्याचे जगणे विस्कटले--
तो जगाचीच व्यथा बांधिल शब्दात पुन्हा !

मी कळ्या टाळुन काटे उचलाया फिरतो---
कोण देईल मला साथ प्रवासात पुन्हा ?

...दाद देण्यासाठी खरेतर पूर्ण गझल आहे...
सुनंदाताईने फोनवर ऐकवली होतीच,
आता इथे वाचली... आवडली आणि आवडली...

शिवाजीराव, स्वागत...!
 
मी जिवाची अपुल्या चेतवुनी वात पुन्हा;
दाट काळोख पुसायास बसे गात पुन्हा
खुद्द वाऱ्यावर ज्याचे जगणे विस्कटले--
तो जगाचीच व्यथा बांधिल शब्दात पुन्हा !
मी कळ्या टाळुन काटे उचलाया फिरतो---
कोण देईल मला साथ प्रवासात पुन्हा ?
 
क्या बात है...!   उत्तम उतरले आहेत हे शेर...शुभेच्छा.

वा शिवाजीराव,
गझल आवडली. मैफिलीत स्वागत.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

खरचं खुप सुन्दर गझल आहे......
आशय काळजाला हात घालणारा आहे.....!
तू नको न्हाउस पाण्यात खुले या प्रहरी---
लावते काय उभी आगच डोहात पुन्हा?

खुद्द वाऱ्यावर ज्याचे जगणे विस्कटले--
तो जगाचीच व्यथा बांधिल शब्दात पुन्हा !

हे दोन शेर तर............ सही..!
गझल आवड्ली...!