कसे मानू तुला माझा...

कसे मानू तुला माझा जरासा भासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही


कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही


कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही


कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही


उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही


कशाची पूर्तता नाही, मिळाले अर्धवट सारे
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही


उपेक्षित सोन-स्वप्नांची अपेक्षा व्यर्थ तू धरते
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही


सुगंधाशी दिले संबंध मी झिडकारुनी माझे
जवळ माझ्या अता उरले पुरेसे श्वासही नाही


तुझ्या ओठी पुन्हा माझे कधीही नाव ना यावे
म्हणूनच आज मक्त्याचा मला हव्यासही नाही


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

म्हात्रेसाहेब, गझल मस्तच!
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही,
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही
-- हे मिसरे फार फार आवडले.
आणि शेवटचे २ शेर तर क्या बात है! एकदम फिदा!!

उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही .... क्या बात है
कशाची पूर्तता नाही, मिळाले अर्धवट सारे
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही.... सुंदर
 
स्वागत आणि शुभेच्छा.
 
 

[quote=प्रदीप कुलकर्णी]उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही .... क्या बात है
कशाची पूर्तता नाही, मिळाले अर्धवट सारे
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही.... सुंदर

 
स्वागत आणि शुभेच्छा.[/quote]
अगदी असेच. वरील शेर फार आवडले.

पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही
सुंदर मिसरा आहे...संपूर्ण गझल चांगली जमून आली आहे..

उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही

क्या बात है...

सुगंधाशी दिले संबंध मी झिडकारुनी माझे
जवळ माझ्या अता उरले पुरेसे श्वासही नाही.. वा सही शेर..

-मानस६

 

उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही....

 

....वा ! उत्तम शेर !

कसे मानू तुला माझा जरासा भासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही
आणि
कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही.
हे शेर विशेष आवडले.

सुगंधाशी दिले संबंध मी झिडकारुनी माझे
जवळ माझ्या अता उरले पुरेसे श्वासही नाही

क्या  बात है यार 

उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही

आशावाद आणि सोसण्याची जिद्द आहे.....

कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही

हे वळ्ण छान आहे...

जरी म्हणतेस प्रेमावर तुझा विश्वासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही

कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही

कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही

कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही

उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही

कशाची पूर्तता नाही, मिळाले अर्धवट सारे
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही

उपेक्षित सोन-स्वप्नांची अपेक्षा व्यर्थ तू धरते
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही

सुगंधाशी दिले संबंध मी झिडकारुनी माझे
जवळ माझ्या अता उरले पुरेसे श्वासही नाही

तुझ्या ओठी पुन्हा माझे कधीही नाव ना यावे
म्हणूनच आज मक्त्याचा मला हव्यासही नाही

-जनार्दन केशव म्हात्रे
म्हात्रे निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

मतल्यामध्ये बदल केला आहे, तरी प्रतिसादामध्ये पाठविलेली गझल नव्याने प्रकाशित करावी.....
धन्यवाद....