असोशी....

भेटण्याची राहिली नाही असोशी...
जोडला संबंध आत्म्याचा तिच्याशी...


हाय संपत्ती कमवली एवढी की
मी सदाही ठेवतो चाकू उशाशी...!


काय अपवादा तुझा खोटा जिव्हाळा..!
जोडला संबंध तू साध्या जगाशी...!!!


मुक्त झाला देवही इतरांप्रमाणे..
ठेवले त्याने मला जेव्हा पुजेशी..!


खोल मी माझ्या मुळा मातीत नेल्या..
मग कुठे संपर्क केला मी नभाशी...अमित वाघ."गुरूमंदिर" सुधीर कॉलनी, अकोला-४४४००१.
मोबाईल नं. :- ९८५०२३९८८२, ९९७०१६७५७२.

गझल: 

प्रतिसाद

दुसर्‍या शेरात हाय संपत्ती कमवली एवढी ..
ऐवजी  हाय संपत्ती कमवली एवढी की.. असे वाचावे..
म्हणजे  शेर असा होईल..
हाय संपत्ती कमवली एवढी की..
मी सदाही ठेवतो चाकू उशाशी...!