सवाल...

गावात वंचनेच्या माझा महाल होता..
काखेत दु:ख ज्याच्या तो द्वारपाल होता..

"बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई..?" 
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता..!!

 बेभान आसवांनी केली अशी कमाई;
आजन्म ठेवलेला ओला रुमाल होता...!

गर्भात प्रेत माझ्या निष्पाप अर्भकाचे;
आयुष्य भोगणारा मृत्यू दलाल होता..

कोड्यात संयमाच्या संन्यास हेलकावे..
आसक्त उत्तराचा जेथे सवाल होता..!

गझल: 

प्रतिसाद

गावात वंचनेच्या माझा महाल होता..
काखेत दु:ख ज्याच्या तो द्वारपाल होता..       सुंदर

"बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई..?" 
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता..!!        ज  ब  र  द  स्त

कोड्यात संयमाच्या संन्यास हेलकावे..
आसक्त उत्तराचा जेथे सवाल होता..!            छान कल्पना...पण संदिग्ध !
शुभेच्छा, अमित...छान लिहितोस...लिहीत राहा.
 
 

प्रदीपशी सहमत!
बदलू कसे ..
हा शेर तर कायम स्मरणात राहील असा!
जियो!
जयन्ता५२

गझल फार आवडली अमित!
प्रदीपजी आणि जयंतरावांशी अगदी सहमत - "सवाल"अतिशय थेट, अस्वस्थ करणारा आणि कायम लक्षात राहील असा आहे!!
"दलाल" शेर नीट कळला नाही.
-- पुलस्ति.

अमित, गझल आवडली.  अर्भकाचा शेर जबरदस्त आहे.

आहे.
वर जयंतरावांनी म्हटल्याप्रमाणे गर्भात वाला शेर लक्षात राहणारा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस