भ्रम.....


अशीच रोज ती मला लपून पाहते...
पहावया नको कुणी जपून पाहते...

जरी असोत शेकडो उरात यातना
तरी मलाच रोज ती हसून पाहते...

मनातले अनेकदा लिहून फाडले
तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...

उगाच पाडला पदर कशास तू गडे?
उगाच का अशी मला लवून पाहते...?

कधीतरी करेन मी तिचीच वाहवा
अशा भ्रमात रोज ती सजून पाहते...

कळेन एकदा मला तिच्या मनातले
म्हणून ती अबोलता सहून पाहते...

करावयास सिद्ध ही पवित्रता तिची
स्वत्:च विस्तवात ती जळून पाहते...





गझल: 

प्रतिसाद

अशीच रोज ती मला लपून पाहते...
पहावया नको कुणी जपून पाहते...
मनातले अनेकदा लिहून फाडले
तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...
कधीतरी करेन मी तिचीच वाहवा
अशा भ्रमात रोज ती सजून पाहते...
छान, अमित...शुभेच्छा !

मनातले अनेकदा लिहून फाडले
तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...
वाव्वा,क्या बात है, अमित. गझल एकंदर फार आवडली.

मस्त गझल अमित! पुन्हा एकदा दाद!! लिहून, सहून आणि जळून हे शेर विशेष आवडले...

मनातले अनेकदा लिहून फाडले
तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...
तुम्ही अगदी मनातले लिहिले आहे. सुंदर गझल आहे.