गेले हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...

गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...

गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी

सांगावयास येथे उरले न आज काही
केली कशास गर्दी डोळयात आसवांनी?


स्वप्नात भेटण्याचे देते वचन हरीला 
राधेस कैद केले  या रीतशृंखलांनी 


होते दडून काही भलतेच शब्द ओठी
लागे मला सुगावा त्यांच्याच त्या खुणांनी


कोणी हसून गेले, कोणी रडून गेले
खोटीच वाहिलेली श्रद्धांजली फुलांनी


हातात काय येथे उरले नि काय तेथे.
त्याचा हिशोब द्यावा परदेशवासियांनी

(अल्याड पल्याड हे शब्द बदलेले आहेत. दूरस्थ या मनांनी
- परदेशवासियांनी केले आहे)

आला वसंत येथे घेऊन विरह गीते..
फुलण्यास ना करावी  बागेतल्या कळ्यांनी...





गझल: 

प्रतिसाद

गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी
छान !

सांगावयास येथे उरले न आज काही
केली कशास गर्दी डोळयात आसवांनी?
अप्रतिम!

स्वप्नात भेटण्याचे देते वचन हरीला 
राधेस कैद केले  या रीतशृंखलांनी 
वा...  वा... !

आला वसंत येथे घेऊन विरह गीते..
फुलण्यास ना करावी  बागेतल्या कळ्यांनी...
ंसुंदर !

 
 
 
 
 

अल्याड काय हाती.. पल्याड काय बाकी..
त्याचा हिशोब द्यावा दूरस्थ या  मनांनी
या शेरात
दूरस्थ पेक्षा दुखावल्या , दुरावल्या असे काही वापरायचे होते, योग्य शब्द सुचवावा.
 

सोनाली,
सांगावयास येथे उरले न आज काही
केली कशास गर्दी डोळयात आसवांनी?

स्वप्नात भेटण्याचे देते वचन हरीला 
राधेस कैद केले  या रीतशृंखलांनी 

या ओळी अप्रतिम.....
- प्राजु.

सोनाली,
गझल आवडली.
राधेस कैद केले  या रीतशृंखलांनी ... हा शेर/मिसरा अप्रतिम.
'अल्याड / पल्याड'चा शेरही अगदी वेगळा आणि प्रत्ययकारी आहे.
'खोटीच वाहिली' मधे २ मात्रा कमी होतात. 'खोटीच वाहिली बघ श्रद्धांजली फुलांनी' असं काहीसं केलं तर?
- कुमार

मतला, आसवांचा आणि श्रद्धांजलीचे शेर आवडले.
अजब

छानच आहे. आवडली. मतला फारच आवडला.  येथे काय हाती चे  पुन्हा बघावे. पुढील गझलेसाठी शुभेच्छा!


दगा फारच आवडला

श्रद्धांजली आणि परदेशवासियानी हे शेर खूप आवडले!

"गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी"
अप्रतिम!!!

सोनाली,
अप्रतिम मक्ता व गझल! तसेच  आसवांनी ,रीतशृंखलांनी  हे शेर खास आवडले.
शुभेच्छा,
जयन्ता५२
एक सूचना: मतला
आला वसंत येथे घेऊन विरह गीते..
फुलण्यास 'ना' करावी  बागेतल्या कळ्यांनी...
--असा लिहल्यास अर्थ  अधिक स्पष्ट होईल्.अर्थात हे माझे मत आहे.



प्रतिसाद, सूचना सर्वांसाठी आभार.
सोनाली

हातात काय येथे उरले नि काय तेथे.
त्याचा हिशोब द्यावा परदेशवासियांनी...

आला वसंत येथे घेऊन विरह गीते..
फुलण्यास ना करावी  बागेतल्या कळ्यांनी..

हे दोन्ही खूप शेर खूप आवडले..
-मानस६


सांगावयास येथे उरले न आज काही
केली कशास गर्दी डोळयात आसवांनी
काहीच सांगायचे नसते तेव्हाच नेमके खूप काही सांगायचे असते..
सुंदर शेर..

गझल फार आवडली....

गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी


सांगावयास येथे उरले न आज काही
केली कशास गर्दी डोळयात आसवांनी?

स्वप्नात भेटण्याचे देते वचन हरीला 
राधेस कैद केले  या रीतशृंखलांनी 
हे शेर तर अप्रतिम.....

गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी
 
.............फ़ारच सुरेख

गेले  हळूच  व्वा......
गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी
होते दडून काही भलतेच शब्द ओठी
लागे मला सुगावा त्यांच्याच त्या खुणांनी

वा सोनालीताई,
एक उत्तम आणि आशयसंपन्न गझल..!

स्वप्नात भेटण्याचे देते वचन हरीला 
राधेस कैद केले  या रीतशृंखलांनी .. वा!!


हातात काय येथे उरले नि काय तेथे.
त्याचा हिशोब द्यावा परदेशवासियांनी... बहोत खूब!
-मानस६

"गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी"

अगदी अगदी :) सही गझल सोनाली !!