मौन

मी जरी  हे बोलण्याचे टाळले होते
आसवांनी मौन कोठे पाळले होते

बोलताना ती जराशी हासली तेव्हा
मी उगाचच अर्थ सारे चाळले होते

दुःख ही येथे खरे मज भेटले नाही
भास हे नुसतेच मी कवटाळले होते

मोजताना घाव माझे आज ही चुकले
आठवेना नाव कुठले गाळले होते

ओळखीचा वाटतो ना चेहरा माझा
ओळखीचे घाव सारे वाळले होते

रोजची पाहून येथे आसवे माझी
दुःख ही माझे मला कंटाळले होते

वाहवा माझ्या न गीताला मिळाली ही
लोक माझ्या वेदनेवर भाळले होते

गझल: 

प्रतिसाद

मतला आवडला. गजल एकंदरीत ठीक आहे. रचना म्हणून छान पण नवीन कल्पनांचा अभाव वाटतो. (माझे प्रांजळ मत.)
अजब

मोजताना घाव माझे आज ही चुकले
आठवेना नाव कुठले गाळले होते
सुंदर...!
 

वाहवा माझ्या न गीताला मिळाली ही
लोक माझ्या वेदनेवर भाळले होते... वा वा!
-मानस६

बोलताना ती जराशी हासली तेव्हा
मी उगाचच अर्थ सारे चाळले होते  ........क्या बात है...

रोजची पाहून येथे आसवे माझी
दुःख ही माझे मला कंटाळले होते ........छानच

वाहवा माझ्या न गीताला मिळाली ही
लोक माझ्या वेदनेवर भाळले होते ........वा.. वा...

................................................................

विश्वास,  हे शेर बेसुमार आवडले....शुभेच्छा !

 

 

बोलताना ती जराशी हासली तेव्हा
मी उगाचच अर्थ सारे चाळले होते

शेर फार आवडले आणि नाव गाळण्याचा शेरही फार आवडला. एकंदर गझल चांगली आणि सफाईदार आहे. आवडली.

आणि नाव गाळण्याचा शेर सगळ्यात जास्त आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस


छान !

मी जरी  हे बोलण्याचे टाळले होते
आसवांनी मौन कोठे पाळले होते

बोलताना ती जराशी हासली तेव्हा
मी उगाचच अर्थ सारे चाळले होते

रोजची पाहून येथे आसवे माझी
दुःख ही माझे मला कंटाळले होते

हे शेर फार आवडले.

छान गझल!


प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

या गझलच्या वेदनेवर भाळलो!
सर्वच शेर चांगले! मतला व शेवटचे दोन शेर विशेष भावले!
पु ले शु
जयन्ता५२

अजब,
प्रांजळ मताबद्दल धन्यवाद..असं बर्‍याचदा होते हे मात्र खर..आणि सुधारणेस कायमचं वाव असतो...
विश्वास

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
विश्वास.

मोजताना घाव माझे आज ही चुकले
आठवेना नाव कुठले गाळले होते

वा! फार्फार आवडला हा शेर...

अर्थ चाळणे आणि मक्ता आवडला

विश्वास,
वाहवा माझ्या न गीताला मिळाली ही
लोक माझ्या वेदनेवर भाळले होते
हा मक्ता आवडला.
- कुमार