जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे
प्रश्न ऐसे..
जयन्ता५२ | ऑगस्ट 21, 2007 - 11:49 am
प्रश्न ऐसे जीवनाने फेकले
पुस्तकांनी हात पुरते टेकले
चांदण्याचे अन फुलांचे मामले
त्यात ही कां हात माझे शेकले?
पाहुनी आसू तुझे, कळले मला
यापुढे आसू न माझे एकले
"काजव्यांना लाभली सत्ता कशी?"
हारलेले 'सूर्य' रडले, भेकले
गायली बेसूर जेंव्हा माणसे
गर्दभांनी सूर सच्चे रेकले
-------------------जयन्ता५२
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.

प्रतिसाद
छानच
छान गझल.
चांदण्याचे अन फुलांचे मामले
त्यात ही कां हात माझे शेकले?
पाहुनी आसू तुझे, कळले मला
यापुढे आसू न माझे एकले
...हे शेर आवडले. शेवटच्या शेरात कर्ता, कर्म, क्रियापद थोडेसे अनिश्चित वाटतात. पण जमतेच.
अभिनंदन!!! ़कॅरी ऑन...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
उत्तुंग कल्पना...
चांदण्याचे अन् फुलांचे मामले
त्यात ही कां हात माझे शेकले?
अप्रतिम...
पाहुनी आसू तुझे, कळले मला
यापुढे आसू न माझे एकले
वा...वा...वा...उत्तुंग कल्पना...
"काजव्यांना लाभली सत्ता कशी?"
हारलेले 'सूर्य' रडले, भेकले
छान.
कुलकर्णीसाहेब, हे तीन शेर फारच आवडले....शुभेच्छा !
हेच.
म्हणतो, जयंतराव, सु रे ख गझल.. आवडली..
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचाकेशवसुमार.
हेच
म्हणतो. 'शेकले' तर फारच आवडले.
मस्त जमवली आहे हो..
पहिले तीन शेर्..अहाहा..!!
अप्रतिम...!!
प्रश्न ऐसे जीवनाने फेकले
प्रश्न ऐसे जीवनाने फेकले
पुस्तकांनी हात पुरते टेकले.. अगदी खरेय..
चांदण्याचे अन फुलांचे मामले
त्यात ही कां हात माझे शेकले?.. बहोत खुब
लिखते रहो..!
-मानस६
जुन्याच कल्पना पण उत्तम मांडणी
प्रश्न ऐसे जीवनाने फेकले
पुस्तकांनी हात पुरते टेकले
चांदण्याचे अन फुलांचे मामले
त्यात ही कां हात माझे शेकले?
शुभेच्छा
वा!
आसू आणि गर्दभ हे शेर आवडले!
धन्यवाद!
आपण सर्व जाणकार प्रतिसादी व मार्गदर्शकांचे मनापासून आभार!
जयन्ता५२