...मित्रा

कसे तुझे रे इमान मित्रा...!
बघून सारे गुमान मित्रा...!

तुझे नि माझे नशीब कोठे,
उदार होते समान मित्रा...?

तुझ्याचसाठी मनात माझ्या,
उभारलेली कमान मित्रा

मुलाहिजा ठेव ह्या कळ्यांचा...
...फुलाफुलांना जुमान मित्रा..

किती करंटे उडून गेले...
...खरे तुक्याचे विमान मित्रा...!

असो तुला याद फक्त माझी..
..अशी अपेक्षा किमान मित्रा...

- प्रा. डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर

या गझलेचे विडंबन ,'मनोगता'वर

गझल: 

प्रतिसाद

तुझ्याचसाठी मनात माझ्या,
उभारलेली कमान मित्रा..आवडला शेर
-मानस६

कुलकर्णीशेठ,
नेहमी प्रमाणे सुरेख गझल..
आणि आपल्या गझलेच्या तळ टिपेचा मान राखण्या साठी आमचा  दुसरा प्रतिसाद मनोगतावर इथे वाचा
केशवसुमार.

किती करंटे उडून गेले...
...खरे तुक्याचे विमान मित्रा...!
असो तुला याद फक्त माझी..
..अशी अपेक्षा किमान मित्रा...
वावा!..मस्त. जमीनच अशी आहे की काही ठिकाणी शब्दक्रमाच्या बाबतीत तडजोड घ्यावी लागली आहेसे दिसते.गझल आवडली.
 
हो. पण कुठे अर्थभेद तर नाही ना होत? कृपया, अवश्य कळवावे.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

शेवटचे ३ शेर खूप आवडले! मुलाहिजा आणि तुक्याचे विमान तर मस्तच!!
मतल्यातला अर्थ मला नीट कळला नाही. पुन्हा वाचीन. २ रा शेर - शब्दरचनेमुळे माझा जरा गोंधळ उडालाय - २-३ दा वाचल्यावर "तुझे आणि माझे नशीब सारख्याच प्रमाणात उदार नव्हते"असा अर्थ लागला. बरोबर कळलाय का शेर मला?

मत्ल्याचा अर्थ असा काहीसा असावा...
एवढे (?) सारे पाहून ही तू गप्प (गुमान) का आहेस, तुझे इमान तुला गप्प राहूनच कसे देते?

हो. अगदी बरोबर आहे.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

हो. अगदी बरोबर.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

दरवेळी नाविन्याचा आग्रह धरणे चुकच ,पण कळ्या फुलांना किती दिवस झोडत बसणार ?

सर्वप्रथम धन्यवाद ! प्रतिसादाबद्दल.
कळ्या - फुले आयुष्यात नसतात थोड्याच! सहा शेरांतून एखादा शेर एखाद्या गझलेत असायला काय हरकत आहे? तोही सुचल्यावर! हं, ओढून ताणून आणल्यासारखा वाटला तर मात्र शेरालाच झोडून काढण्यास हरकत नाही... नव्हे काढावेच.
खूप दिवसांनी आपला काही तरी निरोप मिळाला, याचाच आनंद झाला.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

सर्वप्रथम धन्यवाद ! प्रतिसादाबद्दल.
कळ्या - फुले आयुष्यात नसतात थोड्याच! सहा शेरांतून एखादा शेर एखाद्या गझलेत असायला काय हरकत आहे? तोही सुचल्यावर! हं, ओढून ताणून आणल्यासारखा वाटला तर मात्र शेरालाच झोडून काढण्यास हरकत नाही... नव्हे काढावेच.
अनंतराव, खूप दिवसांनी आपला काही तरी निरोप  - अगदी आपल्या शैलीतला - मिळाला, याचाच आनंद झाला.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

किती करंटे उडून गेले...
...खरे तुक्याचे विमान मित्रा...!

असो तुला याद फक्त माझी..
..अशी अपेक्षा किमान मित्रा...
हे शेर आवडले....

भन्नाट मित्रा.....
किती करंटे उडून गेले...
...खरे तुक्याचे विमान मित्रा...!