एक वेडी वेदनेची जात आहे.


एक वेडी वेदनेची जात आहे
त्यात आता श्रावणाची रात आहे

चांदण्याचा नूर ह्या डोळ्यात माझ्या,
आज हाती चांदण्याचा हात आहे

येउनी ती बैसली माझ्या समोरी,
काय माझ्या मैफिलीची बात आहे!

छंद वेड्या राधिकेचा काय सांगू,
झोपताना बासरी हातात आहे!

आज साऱ्या पाकळ्या ह्या ध्वस्त कैश्या?
-काय माळ्यानेच केला घात आहे?

गझल: 

प्रतिसाद

छंद वेड्या राधिकेचा काय सांगू,
झोपताना बासरी हातात आहे!
 फारच म्हणजे फारच छान...! शुभेच्छा

अतिशय सुंदर ! छंद वेड्या राधिकेचा काय सांगू,
झोपताना बासरी हातात आहे!
हा शेर तर फारच सुरेख !

चांदण्याचा हातही सुंदरच ! अभिनंदन !!!!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

हाच शेर मलाही आवडला.

क्या बात है - बासरी शेर खासच आहे!!
मैफिल शेरही आवडला!

म्हणतो. तुम्हाला फार चांगली तबीयत लाभली आहे. 

हेच म्हणतो,
मानसशेठ गझल एकदम आवडली.. अभिनंदन.. पुलेशु..
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार.

बासरी हातात घेऊन झोपणारी राधा, चांदण्याचा हात या दोन्ही कल्पना अप्रतिम.

सगळे शेर जमून आलेत.
गझल आवडली.

मानस जी
हमारा भी सलाम कूबूल हो!

जयन्ता५२

सर्वांचे मनःपूर्वक आभार....लोभ असू द्यावा!
-मानस६

मानसपंत,
सुंदर गझल..
आज हाती चांदण्याचा हात आहे

येउनी ती बैसली माझ्या समोरी,
काय माझ्या मैफिलीची बात आहे!
हे मिसरे / शेर विशेष आवडले.
- कुमार