फार मी कुठे...फार मी कुठे...


फार मी कुठे गावत नाही
बातमीतही मावत नाही


दोष नेमका शोधत असतो...!
आरसा मला भावत नाही


भोग लाभले जे नशिबाने
बोल त्यांस मी लावत नाही


ओरबाडतो जो नजरेने
रूप त्यास मी दावत नाही


थंड येथले रक्त कसे हे...!
काळजातही धावत नाही..!


दूध पाजले ज्या सापाला,
काय सांगता... चावत नाही...?


                         -प्रा. डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीरगझल: 

प्रतिसाद

थंड येथले रक्त कसे हे...!
काळजातही धावत नाही..! वा

मतला ही सुरेख आहे
-मानस६

छान गझल. आरशाचा आणि काळजाचा शेर फार आवडला.

वा!छान गझल
थंड येथले रक्त कसे हे...!
काळजातही धावत नाही..!


दूध पाजले ज्या सापाला,
काय सांगता... चावत नाही...?

--- हे शेर खास!

जयन्ता५२


मतला, रूप आणि साप शेर मस्तच!
-- पुलस्ति.

मक्ता आवडला, सुंदर कल्पना

वा! मतला आणि थंड रक्त आवडले.
शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
   सॅन होजे, कॅलिफोर्निया

दोष नेमका शोधत असतो...!
आरसा मला भावत नाही
फारच आवडला हो हा शेर.