प्रश्न आहे असा..
==========================
भोवतालावरी घट्ट ताबा तुझा केवढा राहतो..
दूर गेलो कितीही तरी शेवटी मी तुझा राहतो !
आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे?
या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो
हा कसा क्रूस आहे, इथे रोज अस्थिर का वाटते?
नेमका कोणत्या भावनेचा खिळा हालता राहतो?
प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?
काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..
वाटले सर्व काही नव्याने जरी रोजच्यासारखे,
आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...
-ज्ञानेश.
===========================
गझल:
प्रतिसाद
krishna Belgaonkar
गुरु, 29/03/2012 - 15:40
Permalink
oh sweet.........very very
oh sweet.........very very nice poem. i mean gajhal!!!!
नचिकेत
शनि, 15/03/2014 - 20:27
Permalink
प्रश्न नाही असा की पुन्हा का
प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?
वाह!!!
काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..
मस्त!!!
केदार पाटणकर
मंगळ, 18/03/2014 - 11:24
Permalink
ज्ञानेश,
ज्ञानेश,
सुंदर.
भावनेचा खिळा, निर्धार...या कल्पना तर विशेष.
चित्तरंजन भट
मंगळ, 18/03/2014 - 16:56
Permalink
वा. मस्त रे ज्ञानेश. पुन्हा
वा. मस्त रे ज्ञानेश. पुन्हा वाचून आणखी आनंद झाला.
प्रसाद लिमये
शुक्र, 21/03/2014 - 17:17
Permalink
राहतो डाग आणि तडा राहतो
राहतो डाग आणि तडा राहतो
व्वा !!
कैलास
गुरु, 27/03/2014 - 22:36
Permalink
निर्धार फारच छान.
निर्धार फारच छान.