येत नाही मी
जा हो जा येत नाही मी
भाव कुणा देत नाही मी
ना कळले काय झाले ते
माझ्या कवेत नाही मी
गैरसमज आज नाही ते
भलत्याच नशेत नाही मी
माझे मी भोगत आहे
पुण्य कुना देत नाही मी
व्यर्थ जगणे जाहले आता
त्याच्या वाचेत नाही मी
रे , वेडया चालले मी बघ
जा तू वाटेत नाही मी
गझल: