''सरावाने''
कोंडून आसवांना डोळ्यात सरावाने
चिक्कार सहन केले आघात सरावाने
जमलेच गणित नाही,जगण्याचे मरण्याचे
मरतोय रोज थोडा,जगण्यात सरावाने
आयुष्य कंठल्यावर्,झोपडपट्टीमध्ये
मी वावरेन म्हणतो,नरकात सरावाने
धागा मिळतो न सुई,दु:खीत काय घेवुन
काळीज फाटलेले,शिवतात सरावाने
लपवून वेदनेला,''कैलास'' घालतोहे
सदरा सुखी जनाचा,अंगात सरावाने.
--डॉ.कैलास गायकवाड.
गझल: