गझल

निरोपाच्या क्षणी डोळ्यात पाणी दाटले होते
मला माझ्याच अश्रूंनी असे गोंजारले होते

वसंता आजही नाही तुला जमले तसे फुलणे
फुले वेचायला जाताच काटे बोचले होते

जमेला घेत गेलो जी सुखाची वाटली नाती
दुखाच्या कारणांना मी खरे धुंडाळले होते

अता पाऊल पडते पावसाचे वाकडे तिकडे
तुझ्या गालावरी त्याचे ॠतू रेंगाळले होते

तुझ्या उमलून येण्याला मिळाला अर्थ गंधाचा
तुझ्या श्वासात थोडे श्वास माझे माळले होते

मयुरेश साने.. दि ..०३- जुलै-११

गझल: 

प्रतिसाद

अता पाऊल पडते पावसाचे वाकडे तिकडे
तुझ्या गालावरी त्याचे ॠतू रेंगाळले होते
वाह क्या अंदाज है मयुरेश साहब

अता पाऊल पडते पावसाचे वाकडे तिकडे
तुझ्या गालावरी त्याचे ॠतू रेंगाळले होते ........... वाह

तुझ्या उमलून येण्याला मिळाला अर्थ गंधाचा
तुझ्या श्वासात थोडे श्वास माझे माळले होते .........सुंदरच
क्या ब्बात है मयुरेश वाह