लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा

लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा
गुंतलो असाच मी जरा जरा जरा जरा

का असा खुळ्यापरी तुलाच रोज पाहतो
पाहतो मलाच मी जरा जरा जरा जरा

सांग काय टाळतात गूज ओठ बोलके
तू जशी तसाच मी जरा जरा जरा जरा

येतसे कसे मला भरून आज एवढे
वाहता झराच मी जरा जरा जरा जरा

केतकी मनात मी सुगंध गीत गाइले
रान केवडाच मी जरा जरा जरा जरा

माप टाक होउ दे शकून मेंदिचा खरा
शांत चौघडाच मी जरा जरा जरा जरा

मयुरेश साने..दि २१- मे-११

गझल: 

प्रतिसाद

"गूज ओठ बोलके" सुंदर

एकंदरितच छान झाली आहे गझल आणि छानपणे गुणगुणता येत आहे